शहापूर पंचायत समितीचे प्रथम सभापती पांडुरंग जागरे यांचे निधन@

शहापूर(महेश धानके)शहापूर तालुक्यातील नडगाव येथील मुळ रहिवाशी असलेले आणि शहापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून विराजमान झालेले ह.भ.प.पांडुरंग दुदांजी जागरे  यांचे आज शहापुरात ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन म्हणूनही त्यांनी उत्तम प्रकारे काम केले.दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ते संचालक होते.त्यांना सहकार क्षेत्राची उत्तम जाण होती.एक दूरदृष्टीचा नेता म्हणुनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी किसान सहकारी भात गिरणीची मुहूर्तमेढ रोवुन आज ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी दराने भात भरडाई केली जाते.ते शेवटपर्यंत  काँग्रेस पक्षाशी  एकनिष्ठा राहिले. नडगाव मध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुलगे,दोन मुली, जावई, सुना, नातवंडे आणि मोठ्या प्रमाणात भावकी आहे. त्यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी नडगाव येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.त्यांचा  दशक्रिया विधी शनिवार (दि.२६) रोजी तीर्थक्षेत्र संगमेश्वर येथे तर  उत्तरकार्य विधी मंगळवार (दि.२९) रोजी नडगाव येथे राहत्या घरी होणार असल्याची माहिती जागरे कुटूंबियांकडुन देण्यात आली.

संबंधित पोस्ट