उल्हासनगरातील भाजपा युवा मोर्चा गुटख्याचा अवैध धंदा बंद करणार.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात गुटख्याचा राजरोस व्यापार सुरु आहे, या विरोधात भाजप युवा मोर्चा मैदानात उतरला आहे. त्यांनी कॅम्प २ मधील शिरू चौक परिसरात गुटखा पकडून फाडून टाकत माफियांना हा गोरखधंदा बंद करण्याचे आवाहन केले आहे.

उल्हासनगर कॅम्प २ शिरू चौक परिसरात सुरक कुकरेजा, जितू हे दोन गुटखा माफिया राजरोसपणे गुटखा विकत असल्याची माहिती भाजप युवा मोर्च्याचे सुमित मेहरोलिया याना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने मेहरोलिया आणि त्याचे  कार्यकर्ते  त्या ठिकाणी गेले  असता जितू हा त्याच्या ताब्यातील गुटखा तिथेच टाकून पळाला. सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुटख्याची पाकिटे फाडून टाकत नष्ट केले . या घटनेनंतर गुटखा माफियांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सुमित मेहरोलिया यांनी सांगितले कि उल्हासनगर कॅम्प १ ते ५ मध्ये जवळपास १० ते १२ गुटखा माफियांनी बस्तान मांडले आहे. हे गुटखा माफिया युवा पिढी बर्बाद  करीत आहेत. स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन याना या गुटखा माफिया कडुन हप्ता मिळत असल्याने हे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता सर्जीकल स्ट्राईक करून गुटखा नष्ट करणार आहोत.

संबंधित पोस्ट