डोंबिवली पश्चिमेला एकमेव पोस्ट ऑफिस मुळे होत आहेत नागरिकांचे हाल.

डोंबिवली (प्रतिनिधी) : छोट्या जागेमुळे सोशिअल डिस्टसिंगचा होतोय फज्जा.सर्व्हर स्लो असल्यामूळे नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तासंतास रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत आहे.

कर्मचारी अपुरा असल्यामुळे व रजेवर जात असल्यामूळे ठरावीक खिडक्यांवरच काम सुरु, त्यामूळे कामांना होतोय विलंब.

नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लावतात रांगा.

डोंबिवली पूर्वेस ५ पोस्ट कार्यालय मग डोंबिवली पश्चिमेस १ च कार्यालय का..?

डोंबिवली पश्चिमेचे कार्यालय सध्या महापालिकेच्या भाड्याच्या जागेत असून पोस्टाच्या स्वतःची जागा गेले पाच वर्ष  जीर्ण व धोकादायक इमारत म्हणून पडीक आहे.

नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष न करतात लवकरात लवकर कर्मचारी वर्ग वाढवून  सेवा जलद द्यावी व डोंबिवली पश्चिमेस निदान अजून दोन पोस्ट कार्यालय नव्याने सुरु करावी मनसेची  मागणी.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पश्चिमेतील एकमेव पोस्ट ऑफिस बाबत आलेल्या असंख्य तक्रारी नंतर पाहणी केली व नागरिकांच्या व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर  वरील बाबी समोर आल्या.

ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मनसे बांधील असून त्याचा योग्य पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन नागरिकांना दिले गेले.

ह्या प्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर,विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, संदीप म्हात्रे, सचिन कस्तुर,उदय चेऊलकर, राजेश दातखीळ पाटील आदी  मनसे  पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट