उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये खाजगी ट्रस्टची लुटमारी लाकडाच्या नावाने अधिक पैशाची मागणी .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरातील स्मशानभूमी ह्या लुटीचे केंद्र झाले असल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेचे उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला आहे. स्मशानभूमी चालविणाऱ्या ट्रस्टवर कारवाई करण्यासाठी आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.तर येथिल चार ही स्मशानभूमीत हा प्रकार चालत आहे .

उल्हासनगर शहर हे तेरा किलोमीटर क्षेत्रफळात  व्यापलेले आहे. या शहरात चार हिंदू स्मशानभूमी, एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन दफनभूमी आहे. ह्या स्मशानभूमी ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येतात . परंतु या चार ही  स्मशानभूमींंना महानगरपालिके मार्फत सर्व सुविधा अफाट पुरविल्या जात असताना नागरिकांकडून कमी जास्त प्रमाणात अत्यविंधीसाठी रक्कम वसूल केली जाते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिंदू स्मशानभूमीमध्ये पालिकेच्या वतीने देखरेख, सोयीसुविधा व अत्यविंधीसाठी लागणारी लाकडे पुरविण्यात येतात. तरीपण ट्रस्टच्या नावाखाली जनतेकडून ४५० रुपये तर कोणाकडून १२००/- रुपये तर रात्र जास्त झाली तर नाईट चा पण चार्ज हे लावुन अधिक  रक्कम वसूल करतात.

त्याचबरोबर महापालिकेने कधी ट्रस्टला ह्या स्मशानभूमी दिल्या आहे, याबाबत कोणालाही माहीत नाही. तश्या प्रकारची कोठेही नोंद नाही. मग कोणत्या आधारावर स्मशानभूमी देण्यात आल्या आहेत. त्या त्याच्याकडून काढुन महापालिकेच्या  नियंत्रणाखाली ठेवावे. आणि  अशा  स्मशानभूमी ट्रस्ट चालविण्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी  उपमहापौर भगवान भालेराव यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ. राजा दयानिधी याच्याकडे तक्रार केली आहे.

या संदर्भात उल्हासनगर कॅम्प ४  मधील मुक्तिबोध स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष हरेश कृष्णानी यांना विचारले असता ते म्हणाले की स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करताना आम्हाला ठराविक लाकडे मिळतात. पालिका प्रशासन आम्हाला तेवढेच पैसे देतात, मात्र जास्त लाकडे लागल्यास आम्हाला आमच्या पदरचे पैसे द्यावे लागतात, आम्ही कधीही जबरदस्तीने कोणाकडून पैसे घेत नाही.

कोविड किंवा इतर रोगांमुळे मुत्यू झाला असल्यास तात्काळ अंतिम संस्कार होणे गरजेचे असते. असे असताना रात्री उशिरा शव घेऊन आलेल्या नातेवाईकांकडून थेट दोन ते तीन हजार रुपयांची मागणी केली जाते. याबाबतची बोली पहिलेच केली जाते, देण्यास नकार देणाऱ्यांना सकाळी शव घेऊन या मग बघू, असे उद्धटपणे उत्तर दिले जाते तर

ट्रस्ट मार्फत लाकडे मागवली जातात. हि लाकडे ओली असल्यामुळे शव जाळण्यासाठी रिक्षांचे दोन टायर तसेच पाच लिटर डिझेलची मागणी केली जाते. सद्यकाळात वाढलेले डिझेलचे भाव आणि लॉंकडाऊन मध्ये कमी झालेले उत्पन्न यामुळे शव दहन करण्यासाठी वाढलेला खर्च  शहरवासीयांसाठी चिंतेची बाब झाली आहे.   

याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांना विचारले असता या बाबत चौकशी नेमली असून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो पर्यंत हि लूट थांबविण्यासाठी पालिका कोणती पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित पोस्ट