शासनाच्या पुरक - पोषक आहाराचा काळाबाजार करणारी अंगणवाडीची परिवेक्षिका पोलिसांच्या जाळ्यात

डोंबिवली :(प्रतिनिधी)  जिल्ह्यातील  अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थांसाठी   व गर्भवती महीलांना शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या पुरक पोषक आहाराचा  काळाबाजार करणारी अंगणवाडीची परिवेक्षिका पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या आरोपी महिलेसह 59 हजारचा 813 रुपयांची अन्नधान्य पाकिटे आणि इतर उपयोगी वस्तू  जप्त करून टेंपोही ताब्यात घेतला आहे.  सुषमा घुगे असे  अंगणवाडी परिवेक्षिकेचे नाव आहे. तिच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागातील  अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार दिला जातो. मात्र योजनेलाही   "भ्रष्टाचाराची किड" लागली आहे. डोबिवली पुर्व अंतर्गत येणा-या निळजे सेक्टर,  मधील अंगणवाड़ी मधिल लहान मुलांना व गर्भवती महीलांना शासनाकडुन पुरक पोषक आहार योजनेतील जिवनावश्क वस्तुच्या वितरणात अनियमीतता होत असल्याबाबत गोपनिय माहिती जिल्हा परीषद ठाणे, अधिकारी संतोष भोसले आणि जिल्हा परिषद सद्यस रमेश पाटील यांना मिळाली माहीती मिळाली. त्यांनी ही माहिती लगेच मानपाडा पोलिसांना कळवली. तात्काळ मानपाडा पोलिसांनी सापळा रचून काळाबाजार जाणाऱ्या जीवनकवस्तूंचा  टेम्पो रंगेहात पकडला आहे. या टेम्पो मध्ये तेल, गहू, तांदूळ, हळद, मसाला, साखर यांची पाकिटे आणि इतर आवश्यक असलेले वस्तू आढळून आल्या. अन्नधान्य आणि साहित्याची एकूण किंमत 59 हजार 813 इतकी असून सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी  काळाबाजार करणाऱ्या अंगणवाडी परिवेक्षिका सुषमा घुगे हिला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन तिच्यावर  भादंवि  कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज तिला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी  सुनावली असून मानपाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

संबंधित पोस्ट