देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी नोंद

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सतत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे.  गेल्या २४ तासांत देशात उच्चांकी ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर देशात १ हजा २०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे.

एकूण संख्या:- २४ तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील बाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे.

अ‍ॅक्टिव्ह:- देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

मृत्यू:- देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

संबंधित पोस्ट