दहशत माजवून गुंड प्रवृत्तीच्या पोलीस बीट अमलदार गोरख लवटे यांच्यावर कायदेशीर कारवाईची जनतेची मागणी.

मुरुड (प्रतिनिधी) : मुरुड -जंजिरा पोलीस ठाणे अंतर्गत येणारे पोलीस कर्मचारी .श्री. गोरख लवटे सामान्य जनतेला पोलीस चौकीवर बोलावून धमकवणे त्यांच्या कडून पैश्याची मागणी करत असून यांच्यामुळे जनता खूप त्रस्त झाली आहे. चेक -पोस्ट  ला सामान्य

जनतेला गाड्या अडवून धमकी देऊन पैसे  उकळणे  चालू आहे. अवैध धंदे करणाऱ्याच्या गाड्या सोडून देणे. सामान्य

जनतेला गाड्या थांबवून त्रास देणे. रीतसर पावती न देता पैसे उकळणे बैलगाड्यातून पोटापाण्यासाठी वाळू आणणाऱ्या ,सामान्य जनतेकडून  पैश्याची मागणी करत खूप त्रास देत

आहेत. मी पत्रकार संतोष हिरवे यांनी पोलीस कर्मचारी गोरख लवटे यांची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात केली असता

मा. पोलीस निरक्षक रंगराव पवार हे पोलीस कर्मचारी लवटे .यांच्या बाजूने  बोलून त्यांनी आपले हात झटकण्याचे काम केले.

मुरुड तालुका अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. सर्वात ,जास्त अवैध धंदे मुरुड तालुक्यात चालत असून गांज्या विक्री. मटका, हातभट्टी दारू, अवैध वाळू उपसा या धंद्यांमध्ये मुरुड तालुका रायगड जिल्यातील किंग आहे. या अवैध्य धंद्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग कणाडोळा करत ,आहे. कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध हातभट्टी

दारू धंद्यावाल्यांसोबत साठे लोटे असल्यामुळे व पोलीस प्रशासनाचे अभय असल्यामुळे हे अवैध धंदे खूप तेजीत

सुरु आहेत शीघ्रे चेक -पोस्ट वरून हे धंदे वाल्यांच्या गाड्या .बघून सुद्धा कानाडोळा करून सोडून दिल्या जात आहेत. तरी शीघ्रे चेक-पोस्ट वरील सिसीटीव्ही कॅमेरे चालू करून .तपासण्यात यावेत.

श्री. गोरख लवटे हे दुकानदार, हॉटेलचालक, सामान्य ,भाजीपाला विक्रेते, मासळी विक्रेते, यांना दमदाटी करून सामान्य जनते सोबत गुंडगिरी करत आहेत. मी पत्रकार संतोष हिरवे श्री. पोलीस कर्मचारी लवटे यांची तक्रार केल्या

मुळे रेशनिंगवाले, हातभट्टी दारू धंदेवाले त्यांच्याकडे हप्ते ,मागतो म्हणून धमकवले. तक्रार केल्यानंतर हातभट्टी दारू ,किंग यांचे फोन येऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. तरी सर्व ,माहिती मा. पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार यांना लेखी

स्वरूपात दिली असता त्यांनी पोलीस कर्मचारी श्री. लवटे यांना पाठीशी घालण्याचे काम केले. पोलीस प्रशासन हे जनतेचे संरक्षण करण्यासाठी असून मात्र पोलीस कर्मचारी लवटे हे जनतेला धमकावने, दबाव आणणे, पैशाची मागणी

करणे असे कृत्य करत आहेत. वानदे येथील वक्तीला बोलवून मी राहत असल्यामुळे त्यांच्याकडे श्री. लवटे यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली. त्यांना नगरपरिषदेतील कचरा गाडी वरील चालक

यांच्या कडे निरोप देऊन पोलीस स्टेशन ला बोलवून घेऊन  धमकी दिली. पोलीस प्रशासना कडे कायदेशीर पोलीस पाटील असताना देखील विना कायदेशीर व्यक्ती सोबत

निरोप देऊन पोलीस स्टेशन बोलवून पत्रकार यांना येथे  कशे ठेवता. यांची माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे

तुम्हाला दहा हजार रुपये द्यावे लागतील. असे पोलीस कर्मचारी श्री. गोरख लवटे यांनी धमकी दिली. पोलीस कर्मचारी श्री. गोरख लवटे यांच्या कार्याला मुरुड तालुक्यातील जनता खूप त्रस्त झाली आहे. तरी यांची

खातेनिहाय चौकशी होऊन लवकरात लवकर यांची मुरुड  तालुक्यातून हाकलपट्टी व्हावी अशी येथील जनतेची मागणी
आहे.

संबंधित पोस्ट