संतोष पाटील गोराडखेडेकर यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट प्रदान

जालना (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक शिक्षक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यातर्फे त्यांना सामाजिक कार्यासाठी

डॉक्टरेट देण्यात आली. शिक्षक संतोष पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल भोकरदन येथे कार्यरत आहेत. त्याच बरोबर ते व्याख्याते लेखक व समाज सेवक आहेत. संतोष पाटील आपल्या व्याख्यानाच्या मानधनातून विभिन्न वृद्धाश्रम अनाथालयांना अन्नधान्य वैद्यकीय औषधे अशी मदत करतात. तसेच रस्त्यावर असणारे भिकारी व इतर गरजू लोकांना नियमित मदत करत असतात. बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचे कार्यसुद्धा त्यांनी केलेले आहे. या  कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व   राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. संतोष पाटील यांनी या पुर्वी देखीलअतुलनीय

सामाजिक कार्य केले.या सामाजिक कार्याची दखल घेऊन नॅशनल व वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. डॉक्टर दत्ताजी शिंदे ,डॉक्टर विलास कदम , डॉक्टर संदीप सिंग यांच्या हस्ते त्यांना भारती विद्यापीठ नवी मुंबई येथे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या प्रसंगी संतोष पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.डाक्टरेट मिळाल्याने माझा आत्मविश्वास अजून जास्त वाढला असून मी या पुढे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून स्वत:ला सामाजिक  कार्यात झोकून देणार आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. भोकरदन येथील न्यू हायस्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संतोष पाटील यांचे  हार्दिक अभिनंदन केले,आणि शाळेत सर्वांना पेढे वाटून आनंद द्विगुणित केला.  तसेच महाराष्ट्र

राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट