किन्हवली येथे झाले डेअरी वर्कर प्रशिक्षण डाॅ. दिलीप धानके यांचे मार्गदर्शन

शहापूर(महेश धानके)नॅशनल स्कील डेव्हलपमेंट काॅरपोरेशन या केंद्र सरकारचे योजनेनुसार   कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवा परिवर्तन मुंबई या एन.जी.ओ.चे माध्यमातून शनिवार - रविवार या सुट्टीचे दिवशी ग्रामीण दुग्धव्यवसायाचे उदिष्ट समोर ठेऊन डेअरी वर्कर हे दोन दिवसाचे प्रशिक्षण काल किन्हवली येथे संपन्न झाले. कोरोनाचे काळातही फक्त दुग्धव्यवसाय हा अत्यावश्यक सेवा असलेला शेतकरी ग्रामीण उदयोग अविरत सुरु होता व याच व्यवसायातून तरुण,महीला व शेतकरी पशुपालक यांचे अर्थाजन कायम राहीले.सर्व उदयोग व्यवसाय ठप्प झालेले असताना दुध विक्री हाच एकमेव घटक शेतकरी वर्गाला सहाय्यभूत ठरला हे पुन्हा एकदा ठासून सिद्ध झाले आहे.त्यामुळे याच शेतीपुरक व्यवसायाना मुख्य व्यवसाय मानून पुढे नेले पाहीजे व शेतकरी उत्पन्न दुप्पट केले पाहिजे या शासन धोरणानुसार हे प्रशिक्षण पार पडले.या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर मध्ये पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांचे वतीने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी मास्टर ट्रेनर म्हणून सर्व प्रशिक्षणार्थीना दोन दिवस पुर्ण वेळ उपस्थित राहून अनमोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात त्यांनी दुग्धव्यवसायाचे अनेक टप्पे सांगून यशस्वी दुग्ध व्यवसायीक कसे व्हावे याबाबत अनमोल मार्गदर्शन केले.या शिबिरार्थीना शासनमान्यता प्राप्त प्रमाणपत्र वितरण केले.या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन युवा परिवर्तन मुंबई या एन जी ओचे ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्ह्याचे मुख्य समन्वयक शरद शिंदे यांनी केले होते लवकरच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शहापूर व मुरबाड तालुक्यात आणखी काही ठिकाणी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन या विषयांचे देखील प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे.तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील खास महिलांसाठी देखील अशी शिबीरे आयोजित करण्याचे नॅशनल स्कील डेव्हलपमेंट काॅरपोरेशन या केंद्र सरकारचे योजनेचे उदिष्ट असल्याची माहिती शरद शिंदे यांनी यावेळी दिली.

संबंधित पोस्ट