उल्हासनगरातील ज्येष्ठ शिवसैनिक दिपक महाजन अनंतात विलीन.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : शहरातील कँप ४ मधील शिवशक्ती काँलनी  शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख दिपक महाजन ( आऊ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने शिवशक्ती परिसर व शिवसैनिकां मध्ये शोकमय वातावरण पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
          
दिपक महाजन हे कळत्या वयापासून शिवसैनिक होते. शिवशक्ती शिवसेना शाखा स्थापनेपासून अखेरपर्यंत शाखाप्रमुख पदावर कार्यरत होते. या शाखा स्थापनेत व येथील शिवसैनिकांची मोट बांधण्यात त्यांची महत्वाची भुमिका होती. या पट्ट्यात शिवसेना भक्कमपणे उभी करण्यासाठी तसेच शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी संघर्षमय सहभाग होता.
       
दिपक महाजन व त्यांच्या पत्नी यांनी ही दोनदा या प्रभागातून निवडणु लढवली होती. मात्र थोडक्याच मतांनी पराभव झाला होता. शिवसेना जेष्ठ नेते चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, महापौर लिलाबाई आशान, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखालील पक्ष व लोकहितवादी प्रत्येक आंदोलनात दिपक महाजन सक्रिय सहभागी होत असत. दिपक महाजन यांच्या जाण्यानं एक खंदा समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ता व चांगला मित्र गमावल्याची खंत अरुण आशान यांनी व्यक्त केली आहे.


संबंधित पोस्ट