पनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ; 10 महिन्यांतील दुसरी घटना

पनवेल : मंगला एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना काल शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी घडली आहे.प्रवासादरम्यान वेदना जाणवू लागल्याने तिला रेल्वेस्थानका वरील महिलांच्या प्रतीक्षालयात नेण्यात आले. तेथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे.दोघांनाही जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.केरळामधील एर्नाकुलम येथून दिल्ली येथे जाणारी कोव्हिड स्पेशल मंगला एक्‍स्प्रेस सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पनवेलजवळ आली.

या एक्‍स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या डॉली सनी (वय 25) या महिलेस प्रसूती वेदना जाणवत असल्याची माहिती रेल्वेस्थानकावर असलेल्या 1 रुपी क्‍लिनिकच्या डॉ. विशाल वाणी यांना देण्यात आली.डॉ. वाणी यांनी स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेची रवानगी स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षागृहात केली. त्यानंतर सुरक्षितरित्या महिलेची प्रसूती घडवून आणली. पनवेल रेल्वेस्थानकावर मागील 10 महिन्यांत घडलेली ही दुसरी प्रसूती असून, नोव्हेंबर 2019 मध्येही मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची प्रक्रिया डॉ. वाणी यांनी पार पाडली होती.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट