रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

बोरघर/माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
      
यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी श्रीम.शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
    
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट