मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले; हॉस्पिटलचा माणुसकीशून्य कारभार चव्हाट्यावर

बेळगाव : महाद्वार रोडवरील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेच्या मृत्यूनंतर तिचे दागिने काढून घेण्याचा प्रकार हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्गाने केला आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. हॉस्पिटलचे बिल भरण्यास असमर्थ ठरलेल्या कुटुंबीयांच्या संतप्त प्रतिक्रियेला कर्मचारी वर्गाला तोंड द्यावे लागले. या हॉस्पिटलमध्ये नेहमीच असे प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतची माहिती अशी की, बैलहोंगल येथून आलेली पार्वती बस्वानाप्पा होळी नामक एक महिला आजाराने मृत्यू पावली.

तीचा मृतदेह ताब्यात देण्याआधी हॉस्पिटलने तीन लाख रुपये भरण्याचा तगादा लावला. तत्पूर्वी आगाऊ स्वरुपात देखील मोठी रक्कम भरून घेण्यात आली होती. मात्र महिलेच्या मृत्यूनंतर बिल भरणा राहून गेल्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले होते. या प्रकाराने त्या महिलेचे नातलग संतप्त झाले व त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला याचा जाब विचारला. यावेळी हाॅस्पिटल कर्मचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीसांनी संपर्क साधला. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने हाॅस्पिटल आवारात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकारामुळे येथे गोंधळ माजला होता. त्यानंतर दागिने परत करण्यात आले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट