आनंदराज आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटी साठी कोट्यावधींचा निधी मंजूर : कामगार नेते रमेश जाधव

बोरघर/माणगांव (प्रतिनिधी) : मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय  ग्रंथालय बांधकाम,सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरूस्ती. तसेच महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम  करण्यासाठी एकूण १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आली.
    
मा.ना.धनंजय मुंडे साहेबांच्या दालनात सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबानी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगान शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
     
मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची दुरुस्ती व आदि कामे प्रलंबित कामांना मंजूरी देण्यात यावी अशी मागणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी लावून धरली होती. या सर्व कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कामगार नेते रमेश मा.जाधव यांना साहेबांनी आदेश दिले होते. हे प्रस्ताव भेटत नसल्यामुळे अनेक वेळा रिपब्लिकन सेना स्टाइल दाखवावी लागली. पण ही मागणी साहेबांनी तडीस नेण्याच्या उद्देशाने लाऊन धरली होती. यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे संपुर्ण युनिट महाराष्ट्रभर अनेक दिवसांपासून आंदोलने करीत होती .
     
सामाजिक न्याय विभागाने औरंगाबादचा एक प्रस्ताव प्रलंबीत ठेवून प्रस्तावांपैकी मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार सवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम मजूर झाली.
      
एकुण चार कामांसाठी निधी १२ कोटी ७९ लाख ७४ हजार १७५ रुपये इतक्या निधीला मंजुरी देउन शासन निर्णय जी. आर.देखील काढण्यात आला आहे.फक्त औरंगाबादचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तोही लवकरात लवकर निकाली काढावा. हि विनंती.
     
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी निधी मंजूर करून घेतली चेअरमन आनंदराज आंबेडकर असल्यामुळे हे शक्य झाले. अनेक राजकारणी उर बडवत आहेत. त्यांनी या आधीही सत्तेत होते.मग एवढी मोठी निधी का कॉलेजला आणली नाही. हे काम फक्त आणि फक्त चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेबांनी शक्य करून दाखवले आहे.

संबंधित पोस्ट