नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळा मध्ये पीडित रा प कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे अग्रीम बिनव्याजी द्या! कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची मागणी !!

बोरघर/माणगांव (प्रतिनिधी) : नैसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठया प्रमाणात वित्त हानी झाली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रा.प. कर्मचाऱ्यांच्या घराचे तसेच मालमत्तांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून काही रा प कर्मचाऱ्यांनी आपल्या घराची तातपुरत्या स्वरूपात डागडुजी केली असून त्यांना अनेक अडीअडचणी ला सामोरे जावे लागत आहे.
    
नैसर्गिक आपत्तीने बाधित रा.प.कर्मचार्यांना  संदर्भाधिन परिपत्रकानुसार अटी व शतींच्या अधिन ३ महिन्याचे वेत्तन मुळ वेतन + महागाई भत्ता आग्रीम बिनव्याजी अदा करण्याची तरतूद आहे . त्याच पार्श्वभूमीवर

नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळा मध्ये पीडित झालेल्या रा प कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे अग्रीम बिनव्याजी देण्याची मागणी कास्ट्राईब  कर्मचारी संघटनेने केली. या संदर्भातील लेखी निवेदन
मा आगार व्यवस्थापक रा प श्रीवर्धन यांच्या मार्फत मा. विभाग नियंत्रक, रा .प .रायगड विभाग पेण. यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन देताना मा आगार व्यवस्थापक श्री एम बी जुनेदी,  कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल गायकवाड, सहायक कार्यशाळा अधीक्षक श्री प्रदीप विचारे, श्री मंगेश चांदोरकर, श्री सागर वाढवलं.आदी कर्मचारी उपस्थित होते.
    
कोरोना काळात एस टी महामंडळाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कटलेले  असून त्यात आजून भर म्हणजे ३ जून व ४ जून च्या नैसर्गिक चक्रीवादळा मध्ये  रा प कर्मचारी भरडला गेला आहे त्यामुळे तीन महिन्याचे अग्रीम बिनव्याजी भेटल्याने मोठया प्रमाणात रा प कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असे जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाड यांचे म्हणणे आहे.

संबंधित पोस्ट