अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अखेर सीबीआयने केला गुन्हा दाखल;

रिया चक्रवर्ती आणि ५ जणांच्या विरोधात आत्महत्येता प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकी यासारखे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

नवी दिल्ली:बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने आज ६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. बिहार सरकारच्या विनंतीनुसार आणि भारत सरकारच्या पुढील अधिसूचनेवर या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे असणार आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी २ जुलै २०२० रोजी पाटणा येथील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयकडून ६ आरोपींसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी बिहार सरकारने केली होती. त्यानुसार, बुधवारी ५ ऑगस्ट रोजी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली.या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली. मात्र, आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शॉव्हिक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह अन्य काही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी या प्रकरणी २५ जुलै २०२० रोजी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केली होती. रिया चक्रबर्ती हिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोही यावेळी त्यांनी केला होता.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट