आज देशभरात ५७,११७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ७६४ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५७,११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. ५० हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या जवळ गेली आहे. भारतात सध्या पाच लाख ६५ हजार १०३ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे.

संबंधित पोस्ट