विवा फाउंडेशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी "संकल्प केळकर" यांची निवड

परिश्रम आणि प्रामाणिकपणा याचे समीकरण म्हणजे "संकल्प केळकर

अलिबाग (प्रवीण रा. रसाळ) विवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन निषाद सांस्कृतिक मंडळ आणि विवा फाउंडेशनच्या सार्वभौमत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत अनेक तरुणांनी संस्थेची धुरा आपल्या भक्कम खांद्यावर सांभाळली, समाजाप्रती आपुलकी व सदभावना ठेवून विविध माध्यमातून, प्रकल्पातून समाजाचे उतराई होण्याचे महत्कार्य करण्याच्या संधीचे त्यानी अक्षरशः सोने केले त्या तरुणांतीलच लक्षवेधी कार्य करणारे एक तरुण "संकल्प केळकर"


ज्याप्रमाणे बावनकशी सोन आपलं अस्तित्व स्वयंसिद्ध करतो त्याचप्रमाणे संस्थेशी प्रामाणिक राहून आपल्या मृदू आणि प्रामाणिक स्वभावाने संस्थेच्या कार्यात बहुमूल्य योगदान देणारे संकल्प केळकर यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही, त्यांच्या आजवरच्या कार्याने पावलोपावली त्यांच्या योग्यतेची प्रचिती दिली आहे व त्याच योग्यतेचा सन्मान करीत विक्रांत वार्डे यांनी संकल्प केळकर यांची निवड रायगड जिल्हा अध्यक्षपदी केल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले, परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या कसोटीवर खर उतरणाऱ्या व्यक्तीला यश मिळाल्याशिवाय राहत नाही असे मत ही त्यांनी व्यक्त केले.


सदर निवडीनंतर संकल्प यांना गहिवरून आले व विक्रांत वार्डे यांच्या विश्वासास सार्थकी ठरवण्याकरता यापुढे ही अथक परिश्रम व मेहनत घेत स्वतःला "ग" ची बाधा होऊ न देता सामाजिक कार्यात आपले निस्वार्थ योगदान करीत राहील असे मत संकल्प केळकर यांनी व्यक्त केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट