नागझरीतील बाल संरक्षण गृहातील अल्पवयीन मुलीला पळविले

पालघर (प्रतिनिधी/3 जुलै):    पालघर  तालुक्यातील नागझरी येथे असणाऱ्या बाल संरक्षण गृह रेस्क्यू फाऊंडेशन येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबतची तक्रार तालुक्यातील मनोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सदर मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून  बुधवारी (1 जुलै) पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भादविसं 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट