फेसबुकवर मैत्री करून 22 लाख लुबाडले

पालघर (प्रतिनिधी/2 जुलै):एका विवाहित महिलेशी फेसबुकवर मैत्री करून तिच्याकडून 22 लाख 76 हजार रुपये लुबाडणाऱ्या दोघांविरोधात पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
महिलेशी फेसबुकवर आरोपींनी मैत्री करून परदेशातून ब्लॅक गोल्ड आणले असून ते सोडविण्यासाठी व इतर विविध कारणे सांगून आरोपींनी सदर महिलेच्या बँक खात्यातून वेळोवेळी 22 लाख 67 हजाराची रक्कम लुबाडली आहे. याबाबतची तक्रार सदर महिलेच्या पतीने तारापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून या आरोपींवर भा.द.वि. सं. कलम 420/384 सह आय. टी. ऍक्ट 66 (सी व डी) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट