"डॉक्टर आपल्या दारी" व "‘मिशन झिरो’ चा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

क्रेडाई-एमसीएचआय , भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड रुग्णांची संख्या शुन्य व्हावी यासाठी दक्षिण मुंबईमध्ये माननीय महापौर  सौ. किशोरीजी पेडणेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ आज करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, क्रेडाई-एमसीएचआय आणि  देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या वाढत्या प्रकोपावर अंकुश लावण्यासाठी आता ‘मिशन झिरो’  उपक्रमाला दक्षिण मुंबईमध्ये सुरूवात करण्यात आली आहे.

मुंबईतील काही भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम (Rapid Action Plan) राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले.  या अनुशंगाने पावलं उचलत“मिशन झिरो” अर्थात शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी या उपक्रमाचा आरंभ नुकताच करण्यात आला. यानुसार दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, मुलुंड आणि भांडुप या सात ठिकाणी ३ आठवडे मिशन झिरो मोहीम राबवण्यास सुरूवात झाली आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दक्षिण मुंबईमध्ये डॉक्टर आपल्या दारीच्या ७ मोबाईल क्लिनिक व्हॅन धावणार आहेत. या व्हॅन खास करून वरळी, एंटॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर अशा विभागांमध्ये धावणार आहेत.  ज्या प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळतील त्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम संशयितांची तपासणी करेल. स्क्रिनिंग दरम्यान आढळणा-या कोरोनाबाधीतांना डॉक्टर लगेच आवश्यक तो सल्ला देतील. एकही कोरोना रुग्ण सुटू नये यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

मुंबई महानगरपालिका महापौर सौ. किशोरीजी पेडणेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दक्षिण मुंबईमध्ये डॉक्टर आपल्या दारीच्या ७ मोबाईल क्लिनिक व्हॅन धावणार आहेत. या व्हॅन खास करून वरळी, अँटॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर अशा विभागांमध्ये धावणार असल्याचे महापौरांनी सांगितले.  ज्या प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळतील त्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम संशयितांची तपासणी करेल. स्क्रिनिंग दरम्यान आढळणा-या कोरोनाबाधीतांची डॉक्टर लगेच  स्वाँब टेस्ट करेल. एकही कोरोना रुग्ण सुटू नये यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे महापौरांनी सांगितले.  क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्यातर्फे राबवण्यात येणा-या या स्तुत्य उपक्रमाचा दक्षिण मुंबईकरांना लाभ होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे आतापर्यंत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सहयोग द्या आणि महानगरपालिकेची 'मिशन झिरो' आणि "डॉक्टर आपल्या दारी" मोहिम यशस्वी करा,असे आवाहन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

श्री. नयन शाह, अध्यक्ष, क्रेडाइ-एमसीएचआय म्हणाले की “कोविडला नष्ट करण्यासाठी एप्रिलपासून आमची डॉक्टर आपल्या दारीची टीम मेहनत करत आहे. आतार्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये ५ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर ८ हजार कोरोना संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिलेला आहे. मिशन झिरोसाठी आमची अशीच कामगिरी सुरू राहणार आहे. मुंबई १०० टक्के कोरोनामुक्त करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.


तर याबद्दलच ठाम विश्वास व्यक्त करतांना क्रेडाई-एमसीएचआयचे माजी अध्यक्ष श्री धर्मेश जैन यांनी  सांगितलं की, महानगरपालिकेच्या 'मिशन झिरो' उपक्रमाचा उद्देश साधण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.  एकही कोरोना रुग्ण सुटू नये यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. परिसरातले सर्व बाधीत आणि संभाव्य कोरोना रुग्ण यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले तर कोरोना पसरणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. 

भारतीय जैन संघटने(बी.जे.एस.)चे संस्थापक श्री. शांतीलाल मुथा यांनी राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाच्या व्याप्तीकडे लक्ष देत सांगितले की,१ एप्रिलासून आतापर्यंत सुमारे १५ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यातील १९ हजार कोविड संशयित रुग्णांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिलेला आहे. 'मिशन झिरो' अंतर्गत जास्तीत जास्त कोरोना चाचण्याकरुन संसर्ग पसरण्याआधीच सर्व कोरोना रुग्णांना उपचारासाठी क्वारंटाइन अथवा हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहोत.  

तर देश अपनाये फाऊंडेशनचे संस्थापक वल्लभ बंसाली यांनी सांगितलं की, “मुंबईला पूर्वपदावर येण्यासाठी मुंबईकरांना जागृक होणे गरजेचे आहे. कोविड विरोधातील या उपक्रमाच्या फेज २ साठी आम्ही सरकार आणि महानगरपालिकेच्या बरोबरीने काम करत आहोत. मिशन झिरो' नक्कीच यशस्वी करू अशी आम्हाला आशा आहे ' ”.

क्रेडाई-एमसीएचआयबद्दल

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीची (क्रेडाइ-एमसीएचआय) स्थापना १९८२ साली झाली. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील ही प्रमुख आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. बांधकाम विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना क्रेडाइ-एमसीएचआय एका व्यासपीठावर आणून या उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करते. मुंबईतील १८०० अग्रगण्य विकासकांच्या सदस्यत्वासह क्रेडाइ-एमसीएचआयने मुंबई महानगर क्षेत्रातही विस्तार केला असून, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-विरार शहर, रायगड आणि नवी मुंबई येथे संघटनेची कार्यालये आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील निवासी व व्यापारी मालमत्तांच्या संघटित विकासकामांपैकी ८० टक्के कामांचे विकासक क्रेडाइ-एमसीएचआयचे सदस्य आहेत.

 

रिपोर्टर

संबंधित पोस्ट