नेरळ शहरात खाजगी डाॅक्टरला कोरोनाची लागण! नेरळ शहर हादरले; बुधवार पर्यंत नेरळ बंदचा निर्णय! रायगड भूषण विजय मिरकुटेंनी दिली माहीती!

कर्जत(धर्मानंद गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरातील एका खाजगी  डाॅक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने येथे एकच हाहाःकार उडाला आहे, या डाॅक्टरांनी नेरळ शहरातील सुमारे १०० ते १५० विविध आजाराचा रुग्णांचा संपर्कात आल्याने नेरळ शहरात भितीचे सावट पसरले आहे. त्यामुळे नेरळ शहरात रायगड भुषण, कामगार नेते विजय मिरकुटे यांचा नेत्रुत्वाखाली नेरळ व्यापारी फेडरेशनने बुधवार पर्यंत नेरळ बंद पुकारला असल्याची लेखी माहीती विजयजी मिरकुटे यांनी दिली आहे. तसेच नेरळचे सपोनि अविनाश पाटील हेही कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे कामगार नेते विजय मिरकुटे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
        कर्जत तालुक्यांत कोरोना व्हायरस संसर्ग झपाटंयाने वाढत आहे, येथे सुमारे ४५ कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील काही रुग्ण बरे झाले असुन ४ जणांचा म्रुत्यु झाला आहे. असे असतानाच नेरळ शहरात एका खाजगी डाॅक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आहे. त्यातच नेरळ शहारातील अनेक पेशंटचा या डाॅक्टरशी संपर्क आल्याने नेरळ शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळ व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनाची साखली तोडण्याचे प्रयत्न आता सुरु आहेत. या पाश्वभुमीवर नेरळ शहरातील सर्वपक्षीय नेत्यांची नुकताच बैठक झाली असल्याची माहीती रायगड भुषण विजय मिरकुटे यांनी दिली आहे, या बैठकीत नेरळ बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे मिरकुटे यांनी पत्रकारांना सांगितले.
        दरम्यान या बैठकीत कोरोनाचा सद्य परिस्थितीवर चर्चा झाली असुन जनजाग्रुती करुन कोरोनाचा मुकाबला करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. तसेच सोमवार ते बुधवार नेरळ बंद ठेवण्यात येणार असल्साची माहीतीही मिरकुटे यांनी पत्रकारांना कळविली आहे. यावेळी पार पडलेल्या बैठकीस रायगड भुंषण विजय मिरकुटे, सरपंच रावजी शिंगवा, व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, माजी अध्यक्ष अरविंद कटारीया, उपसरपंच शंकर घोडविंदे, भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेशशेठ म्हसकर, नितेश शाह, प्रथमेश मोरे यासंह पक्षांचे पदाधिकारी व नेते तसेच ग्रामपंचायत सदस्य या बैठकीत उपस्थितीत होते.

संबंधित पोस्ट