अंबरनाथमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी जागाच नाही.

सिटी हॉस्पिटलचे बेड संपल्याने अनेक रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये.

अंबरनाथ/ प्रतिनिधी  :  अंबरनाथ शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी जागाच उरलेली नाही. कारण शहरातल्या एकमेव कोव्हीड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळे बेड फुल झाले असून इतर कुठलीही व्यवस्था पालिकेने  अद्याप उभारलेली नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे .

अंबरनाथ शहरात आता पर्यंत  १६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी ११२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी पालिकेने  सिटी हॉस्पिटल हे ६० बेडचं खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतलं असुन  त्या हॉस्पिटल मध्ये बेड फुल झाल्याने  कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे . मात्र आता तिथेही जागा संपल्याने  दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांना ठेवायचं कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे .तर  दुसरीकडे पालिकेकडून ५०० बेड्सचं कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचं काम सुरू असलं तरी ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने  सुरू असल्याने  आता आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? अशा पेचात पालिकेचे अधिकारी सापडले आहेत.

संबंधित पोस्ट