पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय

पुणे - सार्वजनिक गणेशोत्सव यंदा पारंपारिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. उत्सव काळात नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत, गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

कोरोना संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे स्वरूप ठरविण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.यामध्ये श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेउरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, नितीन पंडीत, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनित बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहभागी होते.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशीर्ष, आरती असे सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे.अशा नित्य धार्मिक कार्यक्रमां व्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाज हित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल.

शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट