चुलत काकाने केला गतिमंद पुतणीवर बलात्कार, जाडर बोबलाद गावातील धक्कादायक प्रकार !

सांगली : जिल्ह्यातील जाडर बोबलाद या जत तालुक्यातील गावामध्ये एका गतिमंद मुलीवर तिचे चुलत काका शब्बीर मीरा साहेब राजुरी यांने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

गतिमंद मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत शब्बीर मिरसाहेब राजुरी या हैवानाने गतिमंद मुलीवर जबरदस्ती बलात्कार केला आणि सदर प्रकार घरच्यांना सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ४ मे २०२० रोजी गतिमंद मुलीचा जबरदस्ती लैगिक छळ करत असताना पीडित मुलीच्या आईने शब्बीर मिरसाहेब राजुरी यास रंगेहात पकडले. त्यानंतर पीडित गतिमंद मुलीच्या घरातील सदस्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता यापूर्वी देखील शब्बीरने बलात्कार केला असल्याची धक्कादायक बाब पीडित गतिमंद मुलीने समोर आणली आणि घरच्यांना जर सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी पीडित गतिमंद मुलीच्या आईने उमदी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली असून भा. द. स च्या कलम ३७६(२) एल, ३५४ (अ) आणि ५०६ अनवये गुन्हा दाखल झाला असून शब्बीर मिरसाहेब राजुरी याची तुरुंगवारी करण्यात आली आहे. 

 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट