एकनाथ खडसे यांच्यावर निरंतर होत असलेला अन्याय

महाराष्ट्राच्या राजकारणातील रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे .विधानभवनात सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडणारे खडसे साहेब आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकटे पडलेले आहे.विरोधी पक्षनेते असताना ते महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नावर विधानभवनात धारेवर धरत असत. सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या प्रश्नावर उत्तरे देताना घाम फुटत असे,  असा मुसद्दी नेता आज आपल्याच पक्षाकडून उपेक्षित झालेला दिसत आहे.

चाळीस वर्षांपूर्वी नाथाभाऊंनी आपली राजकीय कारकीर्द कोथळी या छोट्या गावातून सुरू केली होती. बालपणापासूनच नेतृत्वाची कला त्यांच्यामध्ये अवगत होती. याची सुरुवात  महाविद्यालयीन काळात सुरू झाली. याच काळात ते विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून पहिली निवडणूक लढले.व त्या निवडणुकीत ते जिंकून विद्यापीठ प्रतिनिधी झाले. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांची राजकीय वाटचालीची सुरूवीत झाली. खानदेश हा 1970 -80 च्या दशकांमध्ये काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. त्याची पार्श्वभूमी ही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण याच खानदेशात फैजपूर येथे 1936 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशने भरले होते. व तसेच भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मतदार संघ, अशी खान्देशची ओळख होती. आणि येथूनच 1980 च्या दशकात एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व सुरू करण्याचे ठरवले. येथे जिंकून येणं म्हणजे काळया पाषाणात पाणी शोधणे असे होय. तरी ही त्यांनी हार मानली नाही. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षा तर्फे निवडणूक लढायला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांनी प्रथम ग्रामपंचायत लढवून त्यात ते विजयी झाले. व सरपंच पदाची धुरा सांभाळली.  याच काळात  1990 मध्ये त्यांनी आमदारकीची पहिली निवडणूक लढली व त्यामध्ये विजयी झाले. त्यांची अभ्यासू वृत्ती पाहून जाणकार पक्षश्रेष्ठींनी त्यांना 1995 मध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपदाची धुरा त्यांच्यावर सोपवली .1995 ते 1997 मध्ये अर्थ व नियोजन मंत्री हि ते राहिले. 1997 ते 1999 च्या काळात त्यांनी पाटबंधारे व विकास मंत्री यांची धुरा अतिशय योग्य पद्धतीने सांभाळली. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी मैत्री ही त्यांची जगजाहीर होती. जिवलग सखा-मित्र व बहुजनांचा चेहरा ही ह्या दोघांची ओळख होती. सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण घेऊन चालणारे हे दोन्ही नेते  महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचले होते. मुंडे यांचे केंद्रा मध्ये तर नाथाभाऊ यांचे महाराष्ट्रा च्या  राजकारणात  वजन होते. दोघे ही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील महत्वपूर्ण नेते बनले होते. निरंतर पंधरा वर्ष  काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात असल्याने नाथा भाऊंनी विरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली.

           2014 मध्ये संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. महाराष्ट्रामध्ये ही भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले.त्यामध्ये खडसे साहेब व मुंडे यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंडे साहेब यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद द्याण्यात आले. परंतु  अल्पावधीतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  नाथाभाऊ चा सखा- मित्र  जगसोडून गेलेला होता.  ते थोडेसे तुटलेले होते.  परंतु  महाराष्ट्राची  विधानसभा  तोंडावर असल्याने  त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून,  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करून पक्षाला विजय बनवण्याचे काम केले.15 वर्षाच्या नंतर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली. आणि याच वेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदारी सिद्ध केली. संपूर्ण महाराष्ट्राला वाटले की एकनाथ खडसे  ही मुख्यमंत्री होतील. व त्यांची ही इच्छा होती,  परंतु त्यांना बाजूला ठेवून पक्षाने त्यांच्यावर पहिला अन्याय त्याच वेळेस केला.. येथूनच त्यांच्यावर अन्यायाचा प्रवास सुरू झाला होता.

महसूल मंत्री पदावर एक वर्ष असताना त्यांच्यावर भोसरी येथील जमीन प्रकरणी आरोप करण्यात आले .आरोप सिद्ध होण्याच्या अगोदरच पक्ष श्रेष्ठींनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला.व त्यांनी त्यांचा आदेश सर्वौत्परी मानून सर्व पदांचा राजीनामा दिला. नंतर समितीने त्यांना निर्दोष ही ठरवले. निर्दोष ठरवल्यानंतर ही त्यांना अपेक्षा होती की मला परत माझं पूर्ववैभव पक्ष मिळून देईल.परंतु ते केवळ वाटच पाहत राहिले.येथे त्यांच्यावर दुसरा अन्याय झालेला होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ते विधान भवनात वारंवार दाद मागत असत .परंतु यामध्ये त्यांना केवळ अपयश येत होते. सत्तेत येण्यापूर्वी जनतेस केलेले वादे पूर्ण करण्यासाठी ते आपल्याच पक्षाला त्याची जाणीव करुन देत होते. रोखठोक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी विधान भवनात अनेक प्रश्न आपल्याच पक्षांला विचारले. कदाचित याचेच मोल त्यांना चुकावे लागले.

      2014 ला महाराष्ट्राचे मास लीडर असणारे व योग्य आमदारांना तिकीट वाटणारे खडसे यांना 2019 च्या निवडणुकीत दूर ठेवून त्यांची विचाराना ही करण्यात आली नाही. येथे त्यांच्यावर तिसरी वेळेस अन्याय झालेला होता.चौथा जो अन्याय त्यांच्यावर झाला तो असहनीय होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट ही नाकारले. पक्षाची पहिली यादी,  दुसरी यादी लावण्यात आली.तरी ही त्यांच्या नावाचा विचार ही केला नाही. तरीही त्यांना आपल्या पक्षावर भरोसा होता. पण त्यामध्ये त्यांचा भ्रमनिरास झाला. पक्षांनी त्यांना डावलुन त्यांची मुलगी सौ रोहिणी खडसे -खेवलकर यांना तिकीट दिले. परंतु त्यात ही राज तंत्राचा वापर करून त्यांच्या मुलीचा पराजय घडवून आणला. त्यांना हे ही माहीत होते की,  आपल्या मुलीचा पराभव झाला नसून  घडवून आणलेला पराजय आहे. ते वारंवार निवडणूक झाल्यानंतर आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगत होते. तरी ही त्यांची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही.

     त्यांच्यावर होत असलेला अन्याय पाहून मतदार संघातील सर्वसामान्य लोकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना दुसरा पर्याय सुचवण्याचा प्रयत्न ही केला .परंतु पक्षाशी एकनिष्ठ असलेले एकनाथ खडसे आपल्या पक्षाचे एकनिष्ठ राहिले. त्यांना कुठे ना कुठे एक आशेची किरण दिसत होती . राज्यातील विधान परिषदेवर पक्ष आपली निवड करेल, असे त्यांना वाटत होते. व त्यांनी हे बोलूनही दाखवले.  मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यांना या वेळेस असे वाटत होते की आपल्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल याची त्यांना आशा होती. व त्या अनुषंगाने पक्षाच्या राज्य समितीने त्यांच्या नावाची शिफारस केंद्राला केली. सर्वांना वाटत होते की नाथाभाऊ वर पक्षाचा होत असलेला अन्याय आता  दूर होईल. परंतु केंद्रीय समितीने त्यांची उमेदवारी डावलली.त्यांच्या राहिल्या साहिल्या आशेवर ही  पाणी फिरले. येत्या 21 तारखेला होत असलेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी नवीनांना संधी देत आहोत असा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय झाला.
       
     महाराष्ट्रात भाजपला वाढवण्यासाठी जिवाचे रान करणारे,  त्यांच्यावर किती काळ अन्याय करणार ? हा सर्व सामान्य जनतेला निरंतर प्रश्न पडलेला आहे. हट्टा-पोटी  पक्षाने चुकीचे निर्णय घेतले असल्यामुळे  सध्या महाराष्ट्रात भाजप की स्थिति फारशी चांगली राहिलेली नाही. मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात जे लोक बाहेरून आलेत त्यांनी संघटना पातळीवर पक्षासाठी फार काही केलेले दिसून आले नाही. यांच्यावर भाजपाचा विश्वास  आहे.परंतु पक्ष विसरला आहे महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी दिवस-रात्र ज्यांनी एक केली आणि भाजपला मोठा जनाधार मिळवून दिला हेच खरे भाजपाचे कार्यकर्ते. अशेच जर निरंतर होत राहिले तर पक्षाला उतरती कळा लागू शकते. हे ही पक्षाने समजून घ्यायला हवे. नाहीतर असे म्हणावे लागेल, - जेव्हा जोश होता,  तेव्हा होश नव्हता. जेव्हा होश आला,  त्यावेळेस वेळ निघून गेला.....


      प्रा.डॉ. कृष्णा गायकवाड 
           असिस्टंट प्रोफेसर   संशोधक व सामाजिक विश्लेषक

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट