कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वदेश फाऊंडेशनने दिली रायगड जिल्हा रुग्णालयास वैद्यकीय सुरक्षा साधने

बोरघर / माणगांव : रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयास Covid १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यात आला.  

सदर वैद्यकीय सुविधा साधनांमध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे वैद्यकीय सुरक्षा साधने  उदाहरणार्थ ट्रिपल लेयर मास्क ५००००,

एन-९५ मास्क १०००,

थर्मल स्कॅनर -५०, 

पी पी ई किट-७५०, 

पल्स ऑक्सी मिटर २० इत्यादी साहित्य देण्यात आले. 

सदर वैद्यकीय सुरक्षा साधने स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक यांच्या समवेत  समन्वयक नयन पोटले यांचे हस्ते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल फुटाणे, प्रशासकीय अधिकारी श्री.धामोडा पी. डी ,औषध निर्माता कदम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक सुनिल चव्हाण यांचेकडे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुपूर्द करण्यात आली 

स्वदेश फाऊंडेशनने कोरोना च्या पार्श्वभूमीवर आता पर्यंत 

ट्रिपल लेयर मास्क १,५००००,

एन-९५ मास्क  ६०००,

पी पी ई किट-३२००, 

ट्रिपल लेयर मास्क - १५०००० तर

५२ थर्मल स्कॅनर आणि २०पल्स ऑक्सी मिटर देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट