वरळीत लॉटरी विक्रेता सेनेने जंतुनाशक फवारणी मशीन खरेदीसाठी दिला धनादेश

मुंबई: देशासह राज्यात कोरोना प्रदुर्भावामुळे दिवसे दिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध उपाय योजना युद्धपातळीवर करण्यात आल्या आहेत. त्याच आवाहनाला प्रतिसाद देऊन वरळी विभागात शिवसेना शाखा क्र. 198 चे शाखाप्रमुख दीपक बागवे यांच्याकडे शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी जंतुनाशक फवारणी मशीन खरेदी करण्यासाठी दहा हजाराचा धनादेश  सुपूर्द केला. याचा उपयोग वरळी विभागातील शाखा क्रमांक 198 मधील सर्व सोसायट्या, चाळी, गृहनिर्माण संस्था आणि इमारतींना होणार आहे. हा धनादेश देताना शाखाप्रमुख दीपक बागवे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे खजिनदार अविनाश सावंत आणि ईतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट