बिग बींच्या एका शब्दामुळे विचारात पडली कृती

कृती खरबंदाने 'चेहरे' शूटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गुरूवारी कलाविश्वात ५० वर्ष पूर्ण केले आहेत. याच दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री कृती खरबंदाने 'चेहरे' शूटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे. 'चेहरे' चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन आणि कृती यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी कृतीला 'मोहतरमा' म्हणून संबोधले होते.

अभिताभ यांनी मोहतरमा म्हणून हाक मारल्यानंतर कृती भारावून गेली. कृतीने आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले की, 'चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. मी माझा शॉट पाहण्यासाठी गेली तेव्हा माझे सर्वांनी माझे कौतुक केले.' सर्वांनी कौतुक केल्यानंतर बिग बींनी तिला रिटेक घेणार का असा प्रश्न विचारला. 

रिटेक घेणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कृती म्हणाली, 'सर कृपया पुन्हा एकदा टेक घेवूया.' तेव्हा बिग बी म्हणाले, 'तुम्हाला मला विनंती करण्याची काही गरज नाही, तर एक कलाकार म्हणून तुम्हाला आनंदी असायला हवं, या मोहतरमा एक शॉट घेवू' अशी बिग बींसोबतची आठवण तिने ७ नोव्हेंबर रोजी शेअर केली.

अमिताभ बच्चन यांचा ७ नोव्हेंबर १९६९ साली 'सात हिंदुस्तानी' हा पहिला चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला होता. ७ तारखेला सात हिंदुस्तानी प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 


संबंधित पोस्ट