मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला अखेर देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल, असं वाटत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारचा पाच वर्षाचा काळ संपत आल्याने,  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच शिवसेना आणि भाजप यांच्यात वाटाघाटी न झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सत्तास्थापनेची खरी जबाबदारी ही शिवसेनेकडे आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत जवळी वाढत असल्याचं दिसून येत आहे. कारण संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम राहिली आणि शिवसेना भाजप यांची महायुतीत कोणतीही बोलणी पुढे गेली नाही. त्यात सत्तास्थापनेचे मुदत आणखी जवळ येत असल्याने, अखेर देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.


संबंधित पोस्ट