मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू

अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरमध्ये धडक झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. भर दिवसा रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे काही वेळ वाहनांची गर्दी रस्त्यावर पाहायला मिळाली.

भरधाव मालवाहू ट्रकने मागून ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमीवरही उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


संबंधित पोस्ट