डिसेंबरमध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ३८व्या वर्षी करणार लग्न?

ही अभिनेत्री गेल्या एक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या

मुंबई : प्रेमाला वयाचे बंधन नसते. प्रेम ही ठरवून होणारी गोष्ट नाही. तुम्हाला कोण, कधी, कुठे आवडेल, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडाल हे सांगू शकत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या पस्तीशीत लग्नाच्या बोहल्यावर चढल्या. आता या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आणखी एक नाव जोडण्यात आले आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मोना सिंग आहे. मोना सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार मोना सिंग डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे. मोना गेल्या एक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या आणि आता अखेर ती डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा मोनाला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने मौन बाळगले होते. ‘मी सध्या काहीच सांगू शकत नाही’ असे मोना म्हणाली होती. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार मोना डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. मोनाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मोनाने ‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेने मोनाला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून मोनाने तिचा मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळवल्याचे दिसत आहे. मोनाने ‘मिशन ओव्हर मार्स’ या वेब शोमध्ये काम केले होते. 2013 मध्ये सोनी टीव्हीवरील एकता कपूरच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेत मोनाने मुख्य भूमिका साकारली होती. ‘पती, पत्नी और वो’ या नेहमीच्या पठडेबाज शैलीतील या मालिकेतही मोनाचेच पारडे जड होते. त्या मालिकेनंतर मध्यंतरीच्या काळात तिने ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ या शोसाठी सूत्रसंचालनही केले आणि ‘झेड प्लस’ हा चित्रपटही केला.


संबंधित पोस्ट