मेट्रो मॉलसमोर महिलेच्या गळ्यातून 36 हजारांची सोनसाखळी खेचली

नाशिक (प्रतिनिधी) : आई व मुलगी वॉक करून मेट्रोसमोर आल्या असता मंगळवारी (दि. 5) समोरून आलेल्या मोटारसायकलीवरील भामट्याने महिलेच्या गळ्यातील 36 हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पलायन केल्याची घटना घडली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, की अनिल विष्णू रहाणे (वय 53, रा. प्लॉट नंबर 1, बिल्डिंग नंबर 3, अभिषनगर, शिवाजीनगर, नाशिक-पुणे रोड) यांच्या पत्नी अर्चना व मुलगी स्नेहा मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वॉक करून मेट्रो मॉलसमोर असलेल्या ग्रीन माईंड बिल्डिंगच्या गेटसमोर आल्या असता समोरून आलेल्या मोटारसायकलीवरील भामट्याने मोटारसायकल अर्चना यांच्याजवळ हळू करून गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची 36 हजार रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने ओढून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. खडके अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट