मी मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, ईडीला येडी करून टाकीन- शरद पवारांचा सरकारला इशारा

पंढरपूर - सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना सरकार तुरुंगात डांबत आहे. माझ्याही बाबतीत तसा प्रयत्न झाला. पण मी मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही 'तुमच्या ईडीलाही येडी करून टाकीन' असा इशारा शरद पवार यांनी भाजप सरकारला दिला आहे.
पंढरपूर मतदार संघातील आघाडीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजप सरकारवर तुफान हल्ला चढवला. ते म्हणाले की सरकारी तपास यंत्रणांचा वापर गुन्हेगारां विरोधात करण्याऐवजी राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जातो आहे. पी.चिदंबरम यांना तुरुंगात डांबले, कर्नाटकच्या माजी उप मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खायला लावली, सरकारविरुद्ध जो कोणी बोलेल त्याच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे सरकार विरोधकां विरोधात तर सूडबुद्धीने वागत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून तर चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळला छत्रपतींच्या ज्वाज्वल्य इतिहासाची साक्ष असलेल्या गडकिल्ल्यांवर आता दारूचे अड्डे आणि छमछम सुरू करायला निघाले आहेत. दुसऱ्यांना उभे करून आमच्या बरोबर कुस्तीची भाषा करीत आहेत. मात्र आमचे पहिलवान त्यांना कसे चितपट करतील हे येत्या २४ तारखेला कळेल असेही ते म्हणाले.

 कुठे गेला नाशिकला दत्तक घेणारा बाप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महापालिका निवडणुकीत नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती पण त्यानंतर त्यांनी एकदा तरी नाशिकच्या विकासाकडे पाहिले का? आज नाशिकची काय अवस्था आहे ते  येऊन बघ म्हणावं. कुठे गेला नाशिकला दत्तक घेणार बाप असा सवाल पवारांनी नाशिकच्या सभेत नाशिकच्या जनतेला विचारला.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट