वाहतूककोंडीच्या समस्येसह कुलाब्यातील सर्व समस्या सोडवणार -राहुल नार्वेकर

मुंबई: कुलाबा मतदार संघात वाहतूक कोंडीसह पार्किंग,जुन्या चाळीचा पुनर्विकास आदी ज्या काही समस्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे या मतदार संघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ मतदार संघांमध्ये ज्या काही महत्वाच्या रंगतदार लढती आहेत त्यापैकीच एक आहे कुलाबा मतदारसंघ. या मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे भाई जगताप यांच्यात लढत आहे. आमच्या प्रतिनिधीने महायुतीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मतदार संघातील काही समस्या आणि त्या कशा प्रकारे सोडवणार याबाबत सांगितले.

या मतदारसंघात वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या आहे ती कशी सोडवणार?
या मतदार संघात वाहतूक कोंडी बरोबरच ट्राफिक मॅनेजमेंट ,जुन्या जलवाहिन्या ,जुन्या चालींचा पुनर्विकास अशा काही समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे ठोस पावले उचलणार आहोत.

गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारने म्हणावी तशी कामे केली नाहीत असे म्हटले जाते याबाबत काय सांगाल?
आमच्या सरकारने पाच वर्षात जितकी विकासाची कामे केली तितकी कुठल्याही सरकारने केली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांचा विचार करून अनेक मोठे प्रोजेक्ट्स हाती घेतलेत. ज्यात कोस्टल रोड,ट्रान्स हार्बर आणि इतरही काही महत्वाच्या प्रकल्पाच समावेश आहे आणि हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईच्या लोकल वाहतुकीवरचा ताण कमी केला जाणार आहे. मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्याच्या दृष्टीने आम्ही शक्य तितके प्रयत्न करीत आहोत.      

आपण शांततेने प्रचार करीत असताना फ़णसवाडीत जो प्रकार घडला त्याबद्दल काय सांगाल?
निवडणूक प्रक्रियाही शांततेने पार पडायला हवी असे असताना फणसवाडीत ज्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निषेधार्ह आहे. ज्यांनी कुणी असा प्रकार करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना जनताच धडा शिकविलं .
केंद्रातील युती सरकारने राबवलेल्या विकासाच्या आणि जनहिताच्या योजना तसेच राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या चांगल्या कामांचा हवाला देत महायुतीचे उमेदवार प्रचार करीत आहेत तर केंद्र आणि राज्य सरकार सर्वच क्षेत्रात असफल ठरल्याचा आरोप करून विरोधक सरकारवर दडपशाहीचा आरोप करीत आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट