जगतापांच्या 'भाईगिरीला' जनताच उत्तर देईल- राहुल नार्वेकर

फणसवाडीत काँग्रेस -भाजपात राडा

मुंबई-  विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता मुद्द्यावरून गुद्यावर आला आहे कारण फणसवाडीत  महायुतीचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि भाई जगताप एका इमारतीत प्रचार दरम्यान आमने सामने येताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मात्र यावेळी भाजप कार्यकर्त्यांचे संख्याबळ कमी असल्याने काँग्रेसवाल्यांना बळ चढले. मात्र संयमी स्वभावाचे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी इमारतींमधील लोकांना त्रास होऊ नये म्हणून तेथून आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला नेले अन्यथा मोठा राडा झाला असता. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून जगतापांच्या या भाईगिरीला २१ तारखेला जनताच मतदाना द्वारे उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला.
कुलाबा मतदार संघातील फणसवाडी येथील एका इमारतीत राहुल नार्वेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी गेले होते यावेळी त्याच भागात काँग्रेसचे भाई जगताप यांनी रॅली होती. यावेळी भाईंचे कार्यकर्ते त्या इमारतीत प्रचारासाठी घुसले आणि त्याच वेळी जिन्यातून राहुल नार्वेकर खाली उतरत होते. वास्तविक भाईंनी त्यांना जाण्यासाठी रस्ता द्यायला हवा होता पण त्यांनी स्वतःच रस्ता अडवला. त्यामुळे बाचाबाची आणि धक्का बुक्की सुरू झाली. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते अभिषेक शिंदे यांना लाथा मारल्या मात्र राहुल नार्वेकर यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्या नंतर कार्यकर्त्यांनी उमेदवार राहुल नार्वेकर यांना तेथून कसेबसे बाहेर काढले. मात्र या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना हा प्रकार समजताच १५० कार्यकर्ते रस्त्यावर उतरले पण राहुल नार्वेकर यांनी त्यांना शांत केले आणि पुढील अनर्थ टळला. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट