अर्जाची वेळ टळल्याने महिलेचा कार्यालयातून उडी मारण्याचा प्रयत्न

नाशिक(प्रतिनिधी) : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन मिनिटांचा उशीर झाल्याने नाशिक पूर्वसाठी एक इच्छूक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली. तेवढ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात वेळ संपल्याचे सांगत कक्षाचा दरवाजा बंद झाला. त्यानंतर मात्र सदर महिलेचा संताप अनावर झाला. महिलेने पूर्व विभागाच्या कार्यालयाबाहेरून उडी मारण्याचा प्रयत्नही केला. मात्र सुरक्षारक्षकांनी महिलेला खाली आणत तिला नातेवाईंकच्या ताब्यात दिले. नाशिक पूर्व मतदार संघात अपक्ष उमेदवार शीतल पांडे यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडत आपला संताप व्यक्त केला. तीन वाजेनंतर पांडे यांनी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळ संपल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही, असा निवडणूक अधिकार्‍यांनी निर्वाळा दिल्याने सदर महिलेने ठिय्या मांडून आपली व्यथा सांगितली. ही महिला लोकतंत्र जनशक्ती पार्टीची उमेदवार असल्याचे सांगितले. तसेच अनेक  वर्षापासून आपण धुणी भांडी करून उदरनिर्वाह करीत असल्याचेही महिला म्हणाली.

संबंधित पोस्ट