शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बंडाची धग

नाशिक:  नाशिक शहरातील तीन मतदार संघातील पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती . मात्र , याठिकाणी विद्यमान आमदार सीमा हिरे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे .
या घडामोडी च्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची  बैठक पार पडला . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पश्चिमच्या जागेबाबत मागणी केली जाणार आहे . भाजपने ही जागा सोडली नाही तर शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळवून जागा लढविण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले,
  एबी फॉर्म मिळाला नाही तर शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांना राजीनामा द्यायला सांगू . तसेच अपक्ष उमेदवार उभा करून भाजपला जागा दाखवून देऊ असा ईशारा शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांनी  बैठकीत दिला . यावेळी २१ नगरसेवक उपस्थित होते . प्रारंभी शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर व सुदाम ढेमसे यांनी नगरसेवकांनी राजीनामे देण्याचे मत व्यक्त केले . तसेच पश्चिममधून एक उमेदवार देण्यासाठी सर्वानुमते एक नाव द्यावे त्या नावाला सर्वांनी अनुमोदन देऊन जाहीर पाठींबा द्यावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले . तर नगरसेवक भागवत आरोटे यांनी उद्धव ठाकरे जे सागतील तेच करणार असून राजीनामा देण्याचा तूर्तास प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी सुधाकर बडगुजर , विलास शिंदे , डी जी सुर्यवंशी , सुदाम ढेमसे , चंद्रकांत खाडे , भागवत आरोटे , प्रवीण तिदमे , दीपक दातीर , सुवर्णा मटाले , किरण गामाणे , रत्नमाला राणे , हर्षा गायकर , संगीता जाधव , हर्षा बडगुजर , सत्यभामा गाडेकर , भूषण राणे , मामा ठाकरे , बाळा दराडे , पवन मटाले , अमोल जाधव  उपस्थिती होती .

संबंधित पोस्ट