नाशिक मनपा शाळा क्र .१८ च्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा दिल्लीत सत्कार

नाशिक:  महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा क्र. १८ आनंदवल्ली च्या उपक्रमशील शिक्षिका  कुंदा बच्छाव  यांना दिल्ली येथे टिचर इनोव्हेशन अवॉर्ड मानव संसाधन विकास मंत्री ऱमेश पोखरीयाल  यांचे हस्ते  देण्यात आले. सोबत NCTE डायरेक्टर डॉ.सतवीर बेदी,निती आयोगाचे प्रमुख  यदुवेंद्र माथुर,मानव संसाधन विकास शिक्षण सचिव रीना रॉय उपस्थित होते.कुंदा बच्छाव याना टिचर्स इनोव्हेशन ऑवार्ड मिळाल्याबद्द्ल नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त  राधाकृष्ण गमे ,शिक्षण समिती सभापती सरीताताई सोनवणे,उपसभापती प्रतिभाताई पवार, सातपुर प्रभाग सभापती संतोष गायकवाड, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन ,नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले यांनी अभिनंदन केले.मनपा शिक्षण विभागातील  सर्व शिक्षक संघटनाचे अध्यक्ष,सरचिटणीस ,पदाधिकारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

संबंधित पोस्ट