अहो,आश्‍चर्यम! आगमनाअगोदरच गणरायाच्या मुर्त्यांचे मनपाला करावे लागले विसर्जन

नाशिक(प्रतिनिधी):- निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही, याची प्रचिती वेळोवेळी येतेच.अशीच घटना नाशिकच्या गोदामाईला आलेल्या महापुरामुळे घडली आहे. गणरायाच्या आगमणला अद्याप काही दिवस बाकी असतांना,रामकुंड,म्हसोबा, गौरी पटांगणात अचानक काल  गणराय व देवीच्या  मुर्तींनी  दर्शन दिल्याने रामप्रहरीच स्वच्छता निरीक्षक व आरोग्याधिकारी आचंबित झाले.रामकुंड परिसरात मुर्तींचा गाळ व्हायला नको म्हणून आरोग्य व बांधकाम विभागाने त्वरीत या मुर्त्या रामकुंड परिसरातून काडून नेहमीप्रमाणे पडक्या विहिरीत नेल्या.
सतत सुरू असलेल्या पावसाने व अतिवृष्टीने गोदावरी नदीला महापूार आला होता.  या महापुराचे पाणी सराफ बाजार, घरपुरे घाट तसेच गोदावरी कडेला असलेल्या अनेक घरांमध्ये घुसले. भरीस भर वेळोवेळी नोटीसा देऊनही नागरिकांनी पडके घरे व धोकादायक वाडे  न पाडल्याने सततच्या पावसात अनेक वाडे पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाला. हा गाळ शहरातील रस्त्यावरील पसरल्याने मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या निर्माण झाली. महापालिकेच्या विविध विभागामार्फेत रस्त्यावरील गाळ धुण्या बरोबरच बेसमेंन्ट मधील गाळ व पाणी काढण्याचे काम सवरू आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हे काम सूरू असून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.परिणामी रामकुंड परिसराचे पंधरा दिवसानंतर दर्शन झाले.
रामकुंडाची स्वच्छता करण्याच्या उद्तदेशाने रामप्रहरी आलेल्या स्वच्छता निरीक्षकांना चक्क गणरायाच्या व देवीच्या मुर्तींनी दर्शन दिले. अचानक आलेल्या या मुर्त्या पाहून हे वृत्त त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनिल बुकाणे यांना कळविले, ही बातमी बांधकाम विभागाला कळविण्यात आली. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे, पंचवटी विभागाचे विभागिय अधिकारी आर. आर. पाटील यांनी हे ही सकाळीस रामकुंडावर आले. अचानक आलेल्या या मुर्त्यांमुळे अधिकारी आचंबित झाले. गणरायाच्या आगमणाला अद्याप काही दिवस बाकी असतांना या मुर्त्यांवर सोपास्कार करावे लागणार असल्यामुळे यंत्रणा सकाळीसच कामाला जुंपली.
पुराच्या पाण्यात तसेच नदी किनारी असलेल्या  घरातून या मुर्त्या विसर्जन झाल्याचे समोर आले असून, सकाळी सात वाजेपासून या मुर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने मोहिम हाती घेतली होती. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने, पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी आर.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, बांधकाम तसेच इतर विभागातील कर्मचार्‍यांनी हे कामकाज सुरू केले. या मुर्त्या काढण्यासाठी तीन जेसीबी, दोन डंपर, दोन ट्रॅक्टर, दोन घंटागाड्या अशी वाहने सज्ज ठेवण्यात आली. मुर्त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरल्यानंतर रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथे साचलेला केरकचरा व गाळ काढण्यात आला. या संपूर्ण परिसराची आज स्वच्छता मोहिमच हाती घेण्यात आली होती. गंगेच्या वाहत्या पहाण्यात रामकुंड परिसर,स्वच्छ करण्यात आला.

संबंधित पोस्ट