माटुंगा महेश्वरी उद्यान येथे २७ क्रमांकाच्या बेस्ट बसला आग; सुदैवाने प्रवाशी बाहेर पडल्याने कोणीही जखमी नाही

मुंबई : आज वरळी डेपोची बस क्रमांक २७ च्या बसने मुलुंड येथून वरळीकडे महेश्वरी उद्यान ब्रिजवरून जात असताना अचानक पेट घेतला. दुपारी ४.३० वाजता हा प्रकार घडला. बस ड्राइवरच्या केबीन मध्ये इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली असल्यामुळे हा प्रकार घडला. बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली. सुदैवाने सदर घटनेत  कोणी प्रवासी जखमी झाला नाही. मुलुंडच्या वैशाली नगर ते वरळी डेपो या मार्गावर बस मार्ग क्रमांक २७ चालवली जाते. ही बस माटुंगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर महेश्वरी उद्यान येथे दुपारी साडेचार  च्या सुमारास आली. त्यावेळी बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यावेळी बसने पेट घेतला. चालकाने बसमधील अग्निरोधक यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने मुंबई अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.
अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत जळालेली बस डिझेलवर चालणारी होती. याआधीही बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्या बस सीएनजीवर चालणाऱ्या होत्या. मात्र, आता डिझेलवर चालणाऱ्या बसलाही आग लागल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित पोस्ट