नवी मुंबईतील राष्ट्रवादी भाजपच्या गळाला; ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करण्याचा शिवसेना भाजप युतीने कट रचला असून राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते सेना भाजपने फोडायला सुरवात केली आहे आणि आता तर भाजपने नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे संपूर्ण संस्थानच खालसा करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यासाठी काल महापौरांच्या निवासस्थानी या ५२ नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीतच भाजप प्रवेशवावर चर्चा झाली. राष्ट्रवादी आणि शरद पवारांसाठी हा एक मोठा धक्का आहे.
नवी मुंबई हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही गणेश नाईक यांच्या हा बालेकिल्ला ढासळला नाही. महापालिका निवडणुकीतही सत्ता राखण्यात गणेश नाईकांना यश आले. मात्र भाजपने आता एक नवे तंत्र अवलंबले आहेत. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशांना चौकशीची भीती दाखवून पक्षांतर क्रारण्यासाठी मजबूर केले जात आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांवर गंभीर आरोप आहेत. स्वतः गणेश नाईक हे सुद्धा एक प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि याबाबतची सगळी माहिती मंदा म्हात्रे यांच्या मार्फत भाजपला मिळताच भाजपने नवी मुंबईतील राष्ट्रवादीवर जाळे टाकले. त्यानंतर राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण राष्ट्रवादी भाजपात आणण्याचा कट शिजला. भाजप प्रवेशासाठी गणेश नाईक यांच्यावरही त्यांच्या नगरसेवकांचा दबाव वाढत आहे. काल महापौरांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांची एक बैठक झाली आणि त्यात आपणही भाजपात का प्रवेश करू नये असा सवाल पक्ष नेतृत्वाला विचारण्यात आला. याच बैठकीत भाजप प्रवेशवावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नवीमुंबईवर भाजपचा झेंडा फडकणार आहे.यापूर्वी जयदत्त क्षीरसागर आणि सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते शिवसेनेत गेले तर वैभव पिचड आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट