महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश

प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिलाही होत्या

वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये जवळपास ७०० प्रवासी अडकले होते, आता त्या सर्वांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले होते. या प्रवाशांध्ये ९ गरोदर महिलांचाही समावेश होता. दरम्यान, एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी प्रशासनाने विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. कल्याणवरुन ही विशेष ट्रेन निघेल. शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या काळात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात प्रशासनाने सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट