मुंबईच्या मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू

मुंबई - मागील पाच दिवसापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत २० फूट उंच भिंत पडून १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या दुर्घटनेत २ जणांच मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळल्याने एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. यात जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर आहेत. तर  कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात ९ जण, तर मालाडच्या एम. डब्ल्यू रुग्णालयात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालय १९ , कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालय ५२ , परेलच्या केईएम २ , अंधेरीच्या कुपर रुग्णालयात २  जणांवर उपचार सुरु आहेत

चार जणांना वाचवण्यात यश
मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. यात १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि अग्निशमन दल बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल असून बचावकार्यादरम्यान चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
मालाड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत लिहिले की, 'मालाड दुर्घटनेबाबत मी फार दुःखी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे मी सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.' तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट