गांधी विरुद्ध हिंदुत्ववादी निधी

शांती आणि  अहिंसेचे  पुजारी अशी जगात ओळख असलेल्या  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे. त्यामुळे जगात कोणत्याही विचारसरणीचे लोक असोत ते गांधीजींकडे  आदराने पाहतात.  पण ज्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजी यांनी  आपली हयात वेचली  आणि  देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.  त्या भारतात मात्र गांधीजींच्या हत्येनंतरही त्यांच्या विचारांचीही हत्या केली जातेय. गांधीजींचा मारेकरी असलेल्या माथेफिरू नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करणारी एक जमात सध्या भारतात सक्रिय आहे. या जमाती कडून कधी गांधींच्या फोटोवर गोळ्या झाडल्या जात आहेत तर कधी नथुरामची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जात आहे. याचाच अर्थ या देशातून गांधीवादाचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचा कट  शिजतोय आणि सरकारही हिंदुत्ववाद्यांचे असल्याने या कटात सामील असलेल्यांना अभय दिले जात आहे.  अन्यथा मुंबई महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने गांधीजींचे जगभरातील पुतळे हटवण्याची तसेच गांधीजींचा मारेकरी असलेल्या नथुरामचे आभार मानण्याची हिम्मत दाखवली  नसती. वास्तविक या देशातील  कायद्यानुसार गुन्हेगाराला पाठिंबा देणारा किंवा त्याच्या  गुन्ह्याचे समर्थन करणाराही तितकाच गुन्हेगार असतो. त्यामुळे सरकारी सेवेत राहुन  गांधीजींच्या मारेकर्‍याला थँक्यू म्हणणाऱ्या निधी चौधरी हिची केवळ बदली करून चालणार नाही तर तिला सरकारी सेवेतून तात्काळ बडतर्फ करून तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरून तिला अटक करायला हवी. अन्यथा सरकारी सेवेत नथुरामच्या हिंदुत्ववादी विचारांचे जे लोक कार्यरत आहेत त्यांना  बळ मिळेल आणि सरकारी सेवांमध्ये जातीयवाद सुरू होईल. म्हणूनच सरकारने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन जे कोणी प्रशासकीय सेवेलाही भगवा रंग देऊ इच्छित आहेत त्यांचा योग्यरीत्या बंदोबस्त करावा. त्याचबरोबर पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या विषयाची आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण एकीकडे मोदी हे राष्ट्रपित्याने विषयी आदर भाव दाखवत आहेत तर दुसरीकडे त्यांचा पक्ष राष्ट्रपित्याच्या मारेकऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांना निवडून आणीत आहेत म्हणजे नथुरामला मोदींच्या पक्षाकडून तर समर्थन मिळतच आहे पण आता सरकारी सेवां मधले अधिकारीही  राष्ट्रपित्याचा खुलेआम अपमान करीत आहे. खरेतर सरकारने स्वतःहून निधीच्या विरुद्ध कठोर कारवाई हवी होती. महाराष्ट्रात भटजींचे सरकार असल्याने सरकारने निधीकडे दुर्लक्ष केले पण जेव्हा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तेव्हा कुठे निधीची बदली झाली. पण ही कारवाई पुरेशी आहे का कारण एकीकडे देशाविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. पण ज्या महात्म्यामुळे हा देश स्वतंत्र झाला त्याच्या मारेकऱ्यांचे समर्थन करणाऱ्या सडक्या मानसिकतेच्या महिला अधिकाऱ्यावर केवळ बदलीची थातूर-मातूर कारवाई केली जाते हा एक प्रकारे भेदभाव नाही का? याचे उत्तर सरकारने द्यावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ हिंदुत्ववाद्यांसाठी सूडभावनेचा विषय ठरणार असतील तर यापुढे खुशाल गांधीजींचे पुतळे हटवा आणि त्यांच्या जागी  भेकड नथुरामचे पुतळे बसवा  आणि गांधीजींच्या नावापुढील राष्ट्रपिता हा शब्दही   हटवा म्हणजे या देशात कायमस्वरूपी  नथुराम सारख्या जहाल हिंदुत्ववाद्यांचे विचार येणाऱ्या प्रत्येक पीडित रुजतील आणि प्रत्येक तरुण हातात शस्त्र घेऊन  नथुराम बनेल. तोपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व प्रशासकीय सेवांचे भगवेकरण झालेले असेल आणि या सेवांमध्ये चांगले काम करणाऱ्या निधी चौधरी सारख्या महिला अधिकार्‍यांना दलित आदिवासी मुस्लिम यांचे शोषण करायला रान मोकळे मोकळे होईल आणि त्यानंतर भाजपाची मतदार संख्या ही दुपटीने वाढेल. या देशावर बुद्धिजीवी  लोकांऐवजी जातीयवादी नेत्यांची खऱ्या अर्थाने सत्ता येईल. त्यानंतर प्रशासनात  निधी चौधरी, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या सारख्याच हिंदुत्ववादी महिला दिसतील ,तर मायावती सारख्या दलित  महिलांवर निधी चौधरी ची भांडी घासण्याची वेळ येईल. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी साथीदारांची हेच स्वप्न आहे

रिपोर्टर

संबंधित पोस्ट