नाशिक: आंतराराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन ; शिक्षण,साहित्य व कला प्रेमींचा उदंड प्रतिसाद

         १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिक्षण,साहित्य व कला प्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांनी मविप्र शैक्षणिक वारसा संग्रहालयास ७ व्या,१४ व्या व १५ व्या    शतकातील पेशवेकालीन नाणी तसेच निसर्गाशी निघडीत आदिवासी देवतांच्या मूर्ती यावेळी सुपूर्द केल्या. यावेळी  शिल्पकार अनंत खैरनार,मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे,सभापती माणिकराव बोरस्ते,संचालक डॉ.प्रशांत देवरे,सचिन पिंगळे,शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे,डॉ.एस.के.शिंदे,डॉ.एन.एस.पाटील ,कल्पना कुशारे,आदी मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती पवार यांनी पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन द्वारे मविप्र शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या उभारणी पासूनच्या वाटचालीविषयी माहिती देतांना भारतीय शैक्षणिक संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाणारे अनोखे संग्रहालय नासिकमध्ये ‘भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय’ या रूपाने साकारत आहे. तसेच संग्रहालयाची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची, इतिहासातील घडामोडींची माहिती नागरिकांना तसेच ऐतिहासिक संशोधकांना मिळावी या उद्देशाने १८ मे हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी संग्रहालयासाठी नागरिकांनी आपल्याकडील शैक्षणिक दस्तऐवज,कलाकृती,शिल्प दान करण्याचे यावेळी आवाहन केले.


संग्रहालयाची प्रस्तावित उपक्रम :
•विविध अभ्यासक्रम सुरु करणे जसे मोडी लिपी, ब्राह्मी लिपी.
• ऐतिहासिक वास्तू व वस्तू यांचे जतन संवर्धनासाठी ज्ञान देणारे वर्ग सुरु करणे.
• ऐतिहासिक वस्तू , कलाकृती इ. चे प्रदर्शन भरविणे.
• लोककला, विधीनाट्ये व भाषिक चिन्हे इ. जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणे.
 विविध कला –कौशल्ये यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण देणे.
ऐतिहासिक मूल्य व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या कलाकृतींचे दान संग्रहालयास करावे जेणेकरून शैक्षणिक परंपरेला उजाळा देऊन ते भावी पिढीसाठी जतन करता येतील 


 संग्रहालयाची वैशिष्टे.....
जगातील ३ रे व भारतातील १ ले शैक्षणिक संग्रहालय (ग्रीस आणि हॉगकॉग नंतर).
 जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत त्यापैकी वारसा (संस्कृती) आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधित्व करणारे हे तिसरे संग्रहालय.
प्रातिनिधिक चार विभाग करून जागतिक, भारतीय, महाराष्ट्र तसेच मविप्र च्या वाटचालीचा प्रवास
 जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक कलाकृती
 शैक्षणिक व हस्तलिखित साधने
 संशोधनपर प्रबंध
प्रशस्त ग्रंथालय व  ७३ लाख  E-book
 २८ लाख पानांचा हस्तलिखितांचा डेटा
 ४० हजार पीएच.डी चे शोधप्रबंध
 ऐतिहासिक दस्तऐवज छायाचित्र व अन्य दुर्मिळ बाबी
 ट्रेनिंग सेंटर
 जुनी पुस्तके, पारितोषिके, प्रमाणपत्रे
 अॅम्फी थिएटर ,वाचनालय , उपहारगृह
 ग्रंथ शिल्प

संबंधित पोस्ट