लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा : १७ मतदारसंघात ३३ हजार ३१४ मतदान केंद्र; ३ कोटी १२ लाख मतदार

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये २९  एप्रिल रोजी राज्यातील १७  मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. ३ कोटी ११ लाख ९२  हजार ८२३  मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात १ कोटी ६६  लाख ३१  हजार पुरुष तर १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२  तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
या लोकसभा मतदारसंघांमध्ये १०२ विधानसभा मतदारसंघ असून ३३  हजार ३१४  मतदान केंद्र आहेत.  सुमारे १ लाख ७ हजार ९९५  ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 'सखी' मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.
नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :

नंदुरबार- १८ लाख ७० हजार ११७ ( पुरुष-९ लाख ४३ हजार ७४५ , महिला- ९ लाख २६ हजार ३५० ), (मतदान केंद्र-२११५ ) ;

धुळे- १९  लाख ४ हजार ८५९ (पुरुष-९ लाख ९३ हजार ९०३ , महिला-९ लाख १० हजार ९३५ ), (मतदान केंद्र-१९४० ) ;

दिंडोरी- १७ लाख २८ हजार ६५१  (पुरुष- ९ लाख १ हजार ८२ , महिला-८ लाख २७ हजार ५५५ ), (मतदान केंद्र-१८८४ ) ;

नाशिक- १८ लाख ८२ हजार ४६ (पुरुष- ९ लाख ८८ हजार ८९२ , महिला- ८ लाख ९३ हजार १३९ ), (मतदान केंद्र-१९०७ ) ;

पालघर- १८  लाख ८५  हजार २९७ (पुरुष- ९ लाख ८९  हजार, महिला- ८ लाख ९६ हजार १७८ ), (मतदान केंद्र-२१७० ) ;

भिवंडी-  १८ लाख ८९ हजार ७८८ (पुरुष- १० लाख ३७ हजार ७५२ , महिला- ८ लाख ५१ हजार ९२१ ), (मतदान केंद्र-२२०० ) ;

कल्याण- १९ लाख ६५ हजार १३१ (पुरुष- १० लाख ६१ हजार ३८६ , महिला ९ लाख ३ हजार ४७३ ), (मतदान केंद्र-२०६३ ) ;

ठाणे- २३ लाख ७० हजार २७६  (पुरुष- १२  लाख ९३  हजार ३७९ , महिला-१० लाख ७६ हजार ८३४ ), (मतदान केंद्र-२४५२ ) ;

मुंबई उत्तर- १६ लाख ४७ हजार २०८ (पुरुष- ८ लाख ९० हजार, महिला - ७ लाख ५६ हजार ८४७ ), (मतदान केंद्र- १७१५ ) ;

मुंबई उत्तर-पश्चिम- १७  लाख ३२  हजार (पुरुष- ९ लाख ५० हजार ३०२ , महिला- ७ लाख ८१ हजार ७६५ ), (मतदान केंद्र-१७६६ ) ;

मुंबई उत्तर-पूर्व- १५ लाख ८८ हजार ३३१ (पुरुष- ८ लाख ६४ हजार ६४६ , महिला- ७ लाख २३ हजार ५४२ ), (मतदान केंद्र-१७२१ ) ;

मुंबई उत्तर-मध्य- १६ लाख ७९ हजार ७३२ (पुरुष-९ लाख १६ हजार ६२७ महिला- ७ लाख ६३ हजार), (मतदान केंद्र-१७२१ );

मुंबई दक्षिण-मध्य- १४ लाख ४० हजार १४२ (पुरुष- ७ लाख ७७ हजार ७१४ , महिला- ६ लाख ६२ हजार ३३७ ), (मतदान केंद्र- १५७२ ) ;

मुंबई दक्षिण- १५ हजार ५३ हजार ९२५   (पुरुष- ८ लाख ५४  हजार १२१ , महिला- ६ लाख ९९  हजार ७८१ ), (मतदान केंद्र-१५७८ ) ;

मावळ- २२ लाख ९७ हजार ४०५ (पुरुष- १२ लाख २ हजार ८९४ , महिला- १० लाख ९४ हजार ४७१ ), (मतदान केंद्र- २५०४ ) ;

शिरुर- २१ लाख ७३ हजार ५२७ (पुरुष- ११ लाख ४४ हजार ८२७ , महिला- १० लाख २८ हजार ६५६ ), (मतदान केंद्र-२२९६ )

शिर्डी- १५ लाख ८४ हजार  (पुरुष- ८ लाख २१ हजार ४०१ , महिला- ७ लाख ६२ हजार ७३२ ), ( मतदान केंद्र-१७१० ).

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट