‘कुंपणच खातयं शेत’; ग्रोसरी मंडळाला पोखरतेय भ्रष्टाचाराची वाळवी; कामगारमंत्री संभाजी निलंगेकर केव्हा घेणार दखल?

करोडोंच्या भ्रष्टाचारात स्नोमॅन लॉजिस्टिक, व्हिस्टा प्रोसेस फूड्स, प्रिझम फॅसिलिटीज आणि ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी सामील;

नवी मुंबई: किराणा बाजार आणि दुकाने मंडळ(ग्रोसरी बोर्ड) मधील भ्रष्टाचाराची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. यातीलच एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर दि. //१९ रोजी दै. आदर्श महाराष्ट्र्ने वाचा फोडीत 'प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्विस कंपनी खातेय २०० माथाडी कामगारांच्या 'टाळू'वरच लोणी! २०० माथाडी कामगारांच्या जागी दाखविले आहेत बोगस कागदी कामगार; या मथळ्या खाली बातमी प्रकाशित केली होती. परंतु या बातमीची कोणतीही दखल ग्रोसरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. या बातमीची दखल का घेतली जात नाही याचा शोध आमच्या टीमने घ्यायला सुरवात केली असता या भ्रष्टाचाराचे मूळ किराणा बाजार आणि दुकाने मंडळात (ग्रोसरी बोर्ड) येथे असल्याचे लक्षात आले. ग्रोसरी बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने प्रिझम फॅसिलिटीज आणि या सदर कंपन्या शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवीत आहेत. हा भ्रष्टाचार फक्त इथपर्यंतच मर्यादित नसून माथाडी कामगारांच्या घामाच्या पैशांवरही डल्ला मारण्याचे काम ही भ्रष्ट युती करीत आहे.



यात मी एकटा नसून वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील आहेत- ग्रोसरी बोर्डाचे कार्मिक एल.व्ही. खोपडे यांची निर्लज्ज कबुली

सदर प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आदर्श महाराष्ट्रचे प्रतिनिधी यांनी पडताळणी(VR) अहवाल वर सही असलेले आणि सध्या ग्रोसरी मंडळावर कार्मिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले एल.व्ही.खोपडे यांची भेट घेतली

एकूण ३५ कामगारांचे नाव पडताळणी(VR) अहवालात असताना त्यातील फक्त माथाडी कामगारांची नोंदणी ग्रोसरी बोर्डाकडे कशी? आणि तीन माथाडी कामगार पडताळणीच्या वेळी गैरहजर असताना पडताळणी अहवालात त्यांची नावे कशी? या आमच्या प्रश्नांना उत्तरे देताना 'या निर्णयात मी एकटा नसून वरिष्ठ अधिकारी ही सामील आहेत अशी निर्लज्ज कबुली कार्मिक खोपडे यांनी दिली.


अपूर्व गिरीधर पाटील हा बोगस कागदी माथाडी कामगारअपूर्व हा कामगार सेवा पुरविणाऱ्या प्रिझम फॅसिलीटीजकंपनीचे दुसरे मालक विद्याधर पाटील यांचे पुतण्या आहेअपूर्व हा उच्चशिक्षित असून त्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे.

जाणून घेऊया नक्की काय आहे हा भ्रष्टाचार आणि यात ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी सामील कसे

स्नोमॅन लॉजिस्टिक या तळोजास्थीत कोल्ड स्टोरेज कंपनीकडे एकूण २०० कर्मचारी काम करीत आहेत. कामगार नियमानुसार प्रत्येक माथाडी कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. कंपनीत कार्यरत असणाऱ्या माथाडी कामगारांची पडताळणी आणि नोंदी करण्याचे काम ग्रोसरी मंडळाकडे असते. ग्रोसरी मंडळाचे अधिकारी कंपनीला भेट देऊन कार्यरत कामगारांची मोजणी करून नोंदी  करतात. एका टोळी मध्ये तब्बल ३० ते ३५ कामगार, अशा प्रकारे त्याचे वर्गीकरण केले जाते.कंपनीत कामगार कार्यरत आहेत का? याची सत्यता तपासूनच पडताळणी अहवाल तयार केला जातो.

परंतु इथेच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. कामगार सेवा पुरवणारी प्रिझम फॅसिलिटीज आणि स्नोमॅन लॉजिस्टिक कंपनी ग्रोसरी बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अस्तित्त्वात नसलेल्या कामगारांची नावे शासनाकडे नोंदवित आहेत. ओंकार यशवंत महाडिक, प्रतीक प्रभाकर ठाकूर आणि तुषार चंद्रकांत इंगवले आदी कामगार पडताळणीच्या वेळी गैरहजर असताना पडताळणी(VR) अहवालात त्यांचे नाव आहे. तसेच याचा तिघांची अधिकृत कामगार म्हणून ग्रोसरी बोर्डाकडे नोंदणी आहे. पडताळणी अहवालात या तिघांचा कामावर रुजू होण्याचा कार्यकाळ फक्त महिन्यांचा आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की  गेली ते  वर्षे काम करणाऱ्या माथाडी कामगारांची नोंदणी करता फक्त  महिन्यांपासून काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी ग्रोसरी बोर्डाकडे कशी केली जाते? तसेच तब्बल ३५ कामगार असताना फक्त कामगारांची नोंदणी कशी केली जाते? त्यातही अस्तित्वात नसलेल्या  कामगारांची नावे  पडताळणी(VR) अहवालात कशी काय येतात? व्हिस्टा कंपनीतील कामगारांची नावे स्नोमॅन कंपनीच्या पडताळणी(VR) अहवालात मध्ये कशी काय येतात? अशी असंख्य प्रश्नाची उत्तरे ग्रोसरी मंडळाने दडवलेली आहेत. या दोन कंपन्यांचा विचार केला तर दरवर्षी २० ते २५ करोडोंचा शासनाला मिळणार महसूल या कंपन्या आणि ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी गडप करीत आहेत. अशा  अनेक कंपन्या ग्रोसरी मंडळाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हा किती मोठा भ्रष्टाचार आहे याची कल्पना येते.

सध्या या दोन कंपनी आणि ग्रोसरी बोर्डाच्या अधिकार्यां विरोधातील पुरावे आदर्श महाराष्ट्रकडे असून लवकरच याच्या मुळाशी आदर्श महाराष्ट्र पोहचणार आहे.

 

माथाडी कामगारांचे होणारे  शोषण आणि कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची कामगारमंत्री संभाजी निलंगेकर केव्हा घेणार दखल?


माथाडींच्या 'टाळू'वरचे लोणी खाणाऱ्या भांडवलदार कंपन्यांची आणि त्यांच्यासोबत मिलीभगत करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या ग्रोसरी बोर्डाचे अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. आदर्श महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेऊन स्वच्छ चारित्र्याचे राजकारणी समजले जाणणारे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर माथाडींच्या या प्रश्नांची तात्काळ गंभीर दखल घेतील, तसेच ग्रोसरी बोर्डाचे पडताळणी निरीक्षक सी.एल. कोचळे, कारमिक एल.व्ही खोपडे आणि माजी पडताळणी निरीक्षक माधुगडे यांचे तात्काळ निलंबन करून आणि चौकशी समितीद्वारे या भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर काढून कामगारांचे शोषण करणाऱ्या स्नोमॅन,व्हिस्टा फूड्स आणि कामगार सेवा पुरविण्याच्या नावावर फसवणूक करणारी प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट कंपनींवर फसवणूक ४२० चा गुन्हा नोंद करून कंपनीचे लायसन्स रद्द करतील अशी अपेक्षा आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट